spot_img
spot_img
spot_img
spot_img

सामाजिक चळवळ टिकली पाहिजे करीता सामाज कार्यास जरासा वेळ देणे आवश्यक – बालाजी सोनटक्के

श्रीरामपूर ( प्रतिनिधी) :सामाजिक चळवळ टिकली पाहिजे करीता सामाजकार्यास जरासा वेळ देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे सामाजाची प्रगती ही केवळ सरकार किंवा काही नेत्यांच्या कार्यावर अवलंबून नसून, ती सर्वसामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित असते. सामाजिक चळवळी हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असते. या चळवळी समाजात अन्याय, विषमता, भ्रष्टाचार, अज्ञान आणि रूढी परंपरांविरुद्ध आवाज उठवतात. पण या चळवळींचा प्रभाव टिकवायचा असेल, तर प्रत्येक समाजघटकाने आपली जबाबदारी ओळखून समाजासाठी थोडा वेळ द्यायला हवा.आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण “माझं काय जातंय?” या मानसिकतेत जगत आहेत. ही उदासीनता सामाजिक एकात्मतेला बाधा पोहोचवते. जर प्रत्येक व्यक्ती थोडा वेळ समाजहितासाठी खर्च करेल, तर अनेक समस्या निर्माण होण्याआधीच थांबवता येतील. युवकांनी समाजप्रश्न समजून घेतले पाहिजेत, महिलांनी हक्क आणि समानतेसाठी जागरूक राहिलं पाहिजे, आणि ज्येष्ठांनी आपला अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. सामाजिक चळवळ ही टिकवण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सामूहिक हितासाठी काम करणे आवश्यक आहे.

समाज दिशाहीन होईल आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. म्हणूनच, “समाजासाठी वेळ द्यावा, यातुन समाज घडवावा” ही आपली सामूहिक जबाबदारी आहे याकरीता शिव, शाहू,फुले, आंबेडकर प्रबोधन समितीद्वारे वैचारिक परिवर्तन चळवळ उभारली गेली असून राज्यभरातील विविध गांव शहरात याद्वारे सामाजहिताचे कार्य हाती घेण्यात आले आहे,त्याचाच एक भाग म्हणून शिव, शाहू, फुले, आंबेडकर प्रबोधन समितीच्यावतीने सामाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील यशोधन कार्यालयात शनिवार दि.१४ जुन २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी लोकसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष अशोक (नाना) कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मा.बालाजी सोनटक्के साहेब (मा.सहा.आयुक्त,तपास अधिकारी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर) व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.भास्कर लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती,शिव,शाहू,फुले आंबेडकर विचार प्रबोधिनी प्रबोधन व गौरव सोहळ्यात सर्वश्री शिवाजी गांगुर्डे, चांगदेव देवराय,समता फाऊंडेशन चे शौकतभाई शेख, कार्लस साठे,मेजर कृष्णा सरदार यांचा शाल फेटा, पुष्पगुच्छ आणी सन्मान चिन्ह (ट्रॉफी) देवून सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मा.बालाजी सोनटक्के साहेब यांनी सामाजातील उणीवा आणी सामाज्याच्या आशा अपेक्षा आणी उपेक्षा यावर प्रकाश झोत टाकत संघटित राहण्याचे फायदे आणी विखुरले जाण्याचे नुकसान यावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आदिवासी संघटनेचे नेते- शिवाजीराव गांगुर्डे,कार्लस साठे सर, मेजर कृष्णा सरदार, ऍड.मोहसीन शेख,अमोल शिरसाठ यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर अशोक (नाना) कानडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक चळवळ याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी अदिवासी समाजाची पहिली महिला वकील ऍड.प्रियंका शिवाजीराव गांगुर्डे व ऍड.संदेश दिलीप गांगुर्डे यांचा सत्कार करणेत आला.या भरगच्च कार्यक्रमास सर्वश्री नितीन शिंदे सरपंच, दादासाहेब कांबळे, सौ. मोहिनी खैरे, सौ.सोनाली देवराय,निलेश भालेराव, दिपक कदम, दिलीप शेंडे सर, सौ. सुनंदाताई शेंडे, अमोल शिरसाठ, राजेंद्र कोकणे, भाऊसाहेब गव्हाणे, बाळासाहेब सावंत, बंडोपत बोडखे, अर्जुन राऊत, मगर सर, बाळासाहेब गोळेकर, सुदाम मोरे, संजय दळवी, नामदेव कानडे, लक्ष्मण अभंग, नानासाहेब रेवाळे, सतीश बोर्डे, हरिभाऊ बनसोडे, राजेंद्र औताडे, अशिष शिंदे, कल्पेश माने, प्रतीक कांबळे, सम्राट माळवदे, रवि राजुळे, संतोष देवराय, राजू थोरात, संजय केदार, किशोर गाढे, सुभाष पोटे, अशोक खैरे, दिलीप अभंग,समता फाऊंडेशन चे ऍड.मोहसीन शेख, मुश्ताकभाई शेख,नदीम गुलाम, इब्राहीम बागवान सर,शेख फरजाना बाजी, सरताज शेख, ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे,राजू मोरे, प्रियंका गांगुर्डे, कलीम शेख, हारुन बागवान, छगन क्षिरसागर, किशोर सातपुते, भारत कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिनेश देवरे यांनी तर सूञ संचलन-दिलीप शेंडे सर यांनी केले.

Related Articles

पंढरपूरच्या वारीत २८ लाखांच्या गर्दीचे उत्तम नियोजन

  सोलापूर  ( प्रतिनिधी) : पंढरपूरच्या यंदाच्या आषाढी वारीत उच्चांकी २८ लाख वारकरी आणि भाविकांची मांदियाळी जमली होती. परंतु एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण...

शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप

४९ दिव्यांगांना तात्काळ लाभ प्रथमच मोफत हात, पाय, कॅलिपर्स शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कृत्रिम अवयव प्रत्यारोपण मोफत शिबिरास...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!