शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव शहरात प्रथमच अहमदनगर जिल्हा ॲमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन आणि श्री पार्थ पब्लिक स्कूल, बालमटाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धे साठी अखिल भारतीय मुष्टियुद्ध संघटना चे उपाध्यक्ष श्री.मदन कोठुळे सर, श्री.मनोहर ताटवडकर सर महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटना चे सचिव,श्री.विजय भिकोले सर महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटना चे प्रशिक्षक,तसेच श्री.ज्ञानेश्वर खुरांगे सर जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर.श्री.मुटकुळे साहेब, पोलीस निरीक्षक शेवगाव,श्री.कारखिले साहेब नायब तहसीलदार शेवगाव,श्री.भाऊराव वीर सर शेवगाव तालुका क्रीडा अधिकारी,श्री.विशाल गर्जे सर,ता.क्रीडा अधिकारी ,श्रीमती.शैलाजी राऊड मॅडम गटशिक्षणाधिकारी शेवगाव,श्री.भरत देशमुख सर श्री.पार्थ पब्लिक स्कूल बालमटाकळी चे संस्थापक, श्री.डॉ.निरज लांडे,श्री.इरफान पटेल,श्री,रोहन भाऊ लांडे,श्री.विवेक सुर्यवंशी सर अहमदनगर जिल्हा ॲम्युचर बॉक्सिंग असो.चे टेक्नीकल डायरेक्टर इ.मान्यवरांचे उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे .जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी हे एक सुवर्ण संधी आहे. शारीरिक फिटनेस, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक भावना वाढवणारी ही स्पर्धा निश्चितच प्रेरणादायी ठरेल.पालक, नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढवावे, या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग नोंदवावा.असे शेख युसूफ अहमदनगर जिल्हा ॲम्युचर बॉक्सिंग असो चे सचिव यांनी सांगितले.