spot_img
spot_img
spot_img
spot_img

नरेंद्र घुले पाटील हे अभ्यासू व अष्टावधनी नेतृत्व-नितीन पवार

भेंडा(वार्ताहर):– साखर उद्योग चालवत असतांना *ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आणि कामगार सुरक्षित रहावा* यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे माजी आ.नरेंद्र घुले पाटील हे अभ्यासू व अष्टावधनी नेतृत्व असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांनी केले.

*तर ऊस भावा बाबद निश्चिंत रहा,भविष्यात ऊस भावात ज्ञानेश्वर कारखाना जिल्ह्यात नंबर एकवर राहील अशी ग्वाही माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.

भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांचा अभिष्टचिंतनानिमित्त उद्योग समूह व कामगार संघटनेच्या वतीने आयोजित सत्कार सभारंभात श्री.पवार बोलत होते.जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख, काशिनाथ नवले,काकासाहेब नरवडे, अशोकराव मिसाळ, शिवाजी कोलते, बबनराव भुसारी,प्रा.नारायण म्हस्के,दादासाहेब गंडाळ, विकास नन्नवरे,विष्णू जगदाळे, पंडितराव भोसले, सखाराम लव्हाळे,संजय कोळगे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे,मुळाचे संचालक भाऊसाहेब मोटे, बाळासाहेब नवले, दत्तात्रय खाटीक,
आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.पवार पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणसाचे जीवनमान म्हणून उंचावे याकरिता लोकनेते मारुतराव घुले पाटील साहेबांनी ज्ञानेश्वर उद्योग समूहाची मुहूर्त मेढ रोवली, त्यानंतर बदलत्या काळात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील या दोघा बंधुंनी हा उद्योग समर्थपणे पुढे नेला. राज्यातील साखर उद्योगापुढे नवनवीन संकटे येत आहेत, अनेक सहकारी साखर कारखाने खाजगी झालेत, सहकार नेस्तनाभूत होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जोपासत आहे.

सत्काराला उत्तर देतांना *माजी.आ.नरेंद्र घुले पाटील* म्हणाले की, कष्टकरी कामगार हे साखर निर्मितीतून पैशाची निर्मिती करून शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी पोहचविण्याचे काम करत आहेत. सहकाराचे माध्यमातून शेतकरी कामगार यांच्या एकत्रीत प्रयत्नातून सर्वांचा उत्कर्ष हेच साहेबांना अभिप्रेत होते. ज्ञानेश्वर उद्योग समूहामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक बदल घडला. आपला कारखाना अत्याधुनिक आणि परिपूर्ण झालेला आहे आता फक्त शेतकऱ्यांना ऊस भाव आणि कामगारांचे हित हेच लक्ष आहे.ऊस भावा बाबद निश्चिंत रहा,भविष्यात ऊस भावात ज्ञानेश्वर कारखाना जिल्ह्यात नंबर एकवर राहील अशी ग्वाही माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.

माजी आ.पांडुरंग अभंग म्हणाले की,
ज्या ज्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचे सोनं करीत मिळालेल्या पदाला न्याय देत माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी आपले कर्तृत्व आणि कार्यक्षमता सिद्ध केलेली
आहे.

ॲड .देसाई देशमुख* म्हणाले,लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी केलेले संस्कार घुले बंधूनी आपल्या जीवनात अंगीकरून समाजाचे काम करीत आहेत. नरेंद्र घुले पाटलांनी विधानसभेच्या माध्यमातून समाजाची सेवा केली, आता साखर कारखानाही उत्तम चालवीत आहेत. कर्मचारी-कामगारांवर पूर्ण विश्वास टाकून त्यांच्यात संस्थेविषयी आपुलकी निर्माण करून काम करून घेणे ही त्यांची काम करून घेण्याची पद्धत आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून हवे ते बदल करा मात्र हाती घेतलेली कामगिरी चोख करा एवढीच त्यांची अपेक्षा असते.

माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,नेवासा बाजार समितीचे माजी सभापती डॉ.शिवाजी शिंदे,घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,गणेश गव्हाणे,नामदेव निकम, कुमार नवले, रवींद्र नवले, रामभाऊ पाउलबुद्धे,कामगार संघटनेचे सचिव संभाजीराव माळवदे,अण्णासाहेब गर्जे, संजय राऊत,भाऊसाहेब सावंत, तांत्रिक सल्लागार आप्पासाहेब खरड, एम.एस.मुरकुटे, एस. डी.चौधरी, महेंद्र पवार, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, मुख्य अभियंता राहुल पाटील, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,विलासराव लोखंडे, सुनील देशमुख,प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, उपप्राचार्य भारत वाबळे,किशोर मिसाळ आदी उपस्थित होते.कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे सचिव रवींद्र मोटे यांनी आभार मानले.

 

वृक्षारोपण व रक्तदान शिबिर.

माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण  करण्यात आले.तसेच ज्ञानेश्वर उद्योग समूह,मानवता प्रतिष्ठान  व अष्टविनायक रक्तपेढी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन आले.माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते व  जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत झाले. 
88 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Related Articles

Commonwealth Of Australia Sulfur Advantageously On-Line Gambling Casino Critique — innerhalb der Schweiz Start Spinning

Wir bemühen uns, unseren Kunden nicht nur, sondern auch die meisten anderen Produkte anzubieten. hochmoderne Sicherheitsabteilung und Kodierung Softwaresystem zum Schutz Ihrer selektiven Informationen...

Best Methods To Increase Your Profits In Online Roulette national UK territory Spin & Win

Don’t forget, read comparison sites to hear real stories. One of the best tips for beginners is to treat the dealer’s facedown card as...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!