शेवगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ. बाळासाहेब विखे पाटील सी.बी.एस.ई. स्कूल व शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचा वर्धापन दिन उत्साहात, आनंदात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर शाळेच्या प्राचार्या वर्षा दारकुंडे यांनी प्रास्ताविक करत शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला आणि उज्वल भविष्याची दिशा दाखवली. या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य विजय चन्ने व रमेश कवडे हे उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमास रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या प्रभावी भाषणांनी आणि सुमधुर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. रंगभरण स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, सहसचिव मोनिकाताई विखे-सावंत, विश्वस्त ध्रुव राजेंद्र विखे पाटील, कार्यकारी संचालक पंजाबराव आहेर पाटील यांनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचे कौतुक पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सारिका रावस व श्री. संदीप गाडे यांनी करत वातावरण अधिक आनंददायी केले.