spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिक्षण हे जिवन घडवण्यासाठी महत्वाचे – गणेश शिंदे

शेवगाव ( प्रतिनिधी) करियर हे मुलांच्या संगतीवर अवलंबुन असते आज सर्वकाही मार्कासाठी सुरु असुन अपेक्षांच्या पलिकडे जाऊन काळ आणि वेळेनुसार बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार करुन त्यास कठोर अभ्यासाची जोड दिल्यास विदयार्थ्यांच्या जिवनामध्ये यशाचा सुर्य उगवल्याशिवाय राहात नाही हे व्यासपिठावरील उपस्थित सत्कारमुर्तींकडे पाहुन म्हणावे लागेल असे मत प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांनी दि.24 रोजी आमरापुर,ता.शेवगाव येथे आदि फौंडेशन च्या वतीने आयोजित गुणगौरव समारंभामध्ये विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले या वेळी आमदार मोनिका राजळे व्यसपिठावर उपस्थित होत्या

त्यांनी नुकतेच युपीएसी परीक्षा उत्तीर्ण झालेले ज्ञानेश्वर मुखेकर व सौरव ढाकणे तसेच एन डी ए मध्ये लेप्टनंट म्हणुन निवड झालेले श्रेयस भापकर व ईशान चितळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच मतदार संघातील प्रत्येक शाळेतील इयत्ता 10 व 12 वी तील गुणवंत 750 विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज सर्वकाही मार्क्स मिळविण्यासाठी सुरु असुन शिवाजी महाराज, संत तुकाराम देखील दोन पाच मार्कांसाठी आले आहेत तसेच न होता त्या प्रत्येक पात्राबरोबर विदयार्थ्यांना एकरुप होऊन ते जमजावुन घेता आलेतरच त्या अभ्यासाचा आनंद घेता येईल, निट, जेईइ चे पलिकडेपण अनेक क्षेत्र आहेत एनडीए सारख्या क्षेत्रामधुन देखील अनेक विदयार्थी यशस्वी होतांना दिसत आहेत आयुष्यातील 4ते 5 वर्ष खरच प्रयत्न केले तर आयुष्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करता येते. सिसिस्टम बदलवण्यासाठी सिस्टमचा भाग बनवुन मोठे
स्वप्न पाहुन ती बदलण्याची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली कष्ठाला पर्याय नाही संकट येत रहात असतात संत ज्ञानेश्वररांनी शुध्दीपत्रासाठी आई वडीलांचे प्राण दयावे लागलेले आहेत त्यामुळे संकटांना घाबरायचे नाही. नियतीला वेदनांचे देणे घेणे नसते त्यामुळे अर्जुनासारखी रनांगणावर दटुन राहुन यश संपादन करायचे आहे.

यावेळी युपीएसी मधुन निवड झालेले सौरभ ढाकणे यांनी ग्रामिण भागातुन येणा-या मुलांनी योग्य मार्गदर्शन घेऊन त्याला अभ्यासाची जोड देणे गरजचे असते अनेक वेळा अपयश देखील येत असते परंतु खचुन न जाता मोटीव्हेशन घेऊन पुन्हा प्रयत्न करत राहीलात तर यश नक्की मिळते असे सांगीतले तर एनडीए मधुन लेप्टनंट म्हणुन निवड झालेले ईशान चितळे यांनीविदयार्थ्यांनी निट,जेईइ बरोबरच एन डी ए आणि स्पर्धा परीक्षांकडे सुध्दा संधी म्हणुन पहाण्याची गरज असल्याचे सांगितले तर आमदार मोनिका राजळे यांनी मतदार संघातील अनेक मुले वेगवेगळया पदांवर काम करत असतांना पाहुन अभिमान वाटतो मतदार संघाच्या जडण घडणीमध्ये या अधिका-यांची महत्वाची भुमिका असते असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास माजी जि प  सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जेष्ठ नेते बापुसाहेब पाटेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस उमेश भालसिंग, उध्दवराव वाघ, रामकिसन काकडे,नारायण पालवे, काकासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, भगवान साठे, मुकुंद गर्जे, जमिर आतार, संजय टाकळकर, महेश फलके, गणेश कोरडे, नितीन दहिवाळकर, गणेश रांधवणे, भिमराज सागडे, गणेश गरड, उषाताई कंगणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

पंढरपूरच्या वारीत २८ लाखांच्या गर्दीचे उत्तम नियोजन

  सोलापूर  ( प्रतिनिधी) : पंढरपूरच्या यंदाच्या आषाढी वारीत उच्चांकी २८ लाख वारकरी आणि भाविकांची मांदियाळी जमली होती. परंतु एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण...

शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप

४९ दिव्यांगांना तात्काळ लाभ प्रथमच मोफत हात, पाय, कॅलिपर्स शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कृत्रिम अवयव प्रत्यारोपण मोफत शिबिरास...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!