spot_img
spot_img
spot_img
spot_img

सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना  सहावा धक्का

जामखेड ( प्रतिनिधी) जामखेड बाजार समितीचे उपसभापतीचे उपसभापती कैलास वराट यांच्याविरूध्द अविश्‍वास प्रस्ताव आज जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती,नगरपालिका, खरेदी विक्री संघ , कर्जत दूध संघ,नंतर आता जामखेड बाजार समितीमध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना सहावा धक्का दिला आहे.

शरद कार्ले, सचिन घुमरे, नंदकुमार गोरे, अंकुश ढवळे, विष्णू भोंडवे, गौतम उतेकर, गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, राहुल बेदमुथ्था, रवींद्र हलगुंडे, सीताराम ससाणे, नारायण जायभाय या सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला.

त्यात म्हटले आहे की, वराट यांनी कायद्याचे उल्लंघन करून विश्‍वास गमावलेला आहे. ते मनमानी पध्दतीने कारभार करतात. बाजार समितीच्या उपविधी प्रमाणे कामकाज करताना हेतूपुर्वक आम्ही सुचवलेल्या बाबींकडे दुर्लक्ष करून हेळसांड करतात. बाजार समितीमध्ये येणार्‍या शेतकर्‍यांना, नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून सदस्यांनी सुचवलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. बाजार समितीच्या क्षेत्रातील बाजाराची आर्थिक उन्नती होण्यासाठी त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या मालाला व्यवस्थित सोयी सुविधा करण्यासाठी कोणतीही मदत करत नाहीत.शासनाकडून वेळोवेळी निश्‍चित करण्यात आलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी व विक्री होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून कोणतीही मदत करत नाहीत. त्यामुळे उपसभापती कैलास वराट यांनी सदस्यांचा विश्‍वास गमावलेला आहे. त्यांना उपसभापतीपदावरून हटवण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी करत आहोत.

Related Articles

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग करण्याच्या सूचना – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर ( प्रतिनिधी ) सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७...

एकनाथ माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुणे दिन साजरा

  शेवगाव (प्रतिनिधी)शेवगाव तालुक्यातील एरंडगाव  येथील एकनाथ माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दोन महत्त्वपूर्ण उपक्रम साजरे करण्यात आले: वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!