शेवगाव ( प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची प्रपंचाशी निगडित असलेली बँक आहे बँकेद्वारे कर्ज वाटप करताना वाटप केलेल्या कर्जाची वसुली होणे देखील महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक चंद्रशेखर घुले पाटील यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या शेवगाव येथील टाऊन आयोजित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी केले यावेळी चंद्रशेखर घुले पाटील यांनी सांगितलेकी भविष्यकाळात नवोदित कर्मचारी वर्गाने जुन्या अनुभवी अधिकारी वर्गाने कसे काम केले याचा आदर्श घ्यावा कारण शेतकरी आणि बँक यांच्यातील दुवा म्हणून कर्मचारी काम करत असतो
यावेळी सेवानिवृत्त झाल्याबद्दल शेवगाव तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, वसुली अधिकारी जिल्हा सहकारी बँक अहमदनगर हेड ऑफिस मध्ये असलेले डेप्युटी मॅनेजर आढाव साहेब,पायघन साहेब, चौधर साहेब, शाखाधिकारी घाणमोडे साहेब शाखाधिकारी वखरे साहेब यांचा चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे संचालक पंडितराव भोसले, राजाभाऊ पाऊलबुदे, सरपंच काकासाहेब घुले,विलासराव लोखंडे कोठुळे साहेब, भुसारी साहेब, निकम साहेब उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओ एस कोठुळे साहेब यांनी केले सूत्रसंचालन संजय भुसारी यांनी केले त्र आभार निकम साहेब यांनी मानले.