शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव तालुक्यातील एकनाथ माध्यमिक विद्यालय एरंडगाव येथे श्रुतिका भारत गॅस एजन्सी शहरटाकळी यांचे वतीने घरगुती गॅस हाताळण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.श्रुतिका भारत गॅस एजन्सी शहरटाकळी यांचेवतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून सन 2018 पासून शेवगाव तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक, उच्च्य माध्यमिक विद्यालयात घरगुती वापरासंबंधी माहिती देऊन विद्यार्थ्यांना व्यवस्थित गॅस हाताळण्याची कार्यशाळाच उपलब्ध करून दिली जाते.
माजी कृषी अधिकारी रावसाहेब ढाकणे हे या एजन्सी च्या वतीने विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करतात.आजच्या बदलत्या जीवन शैलीत प्रत्येकाच्या घरी गॅस वापराचे प्रमाण वाढलेले आहे. घरातील मोठ्या व्यक्ती बरोबरच घरातील विद्यार्थीही गॅस हाताळत असतात. त्यांना गॅस हाताळण्याचे व्यवस्थित ज्ञान असावे म्हणून विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक माधवराव काटे यांच्या संकल्पनेतून आज विद्यालयात घरगुती गॅस वापरासंबधीची कार्यशाळा संपन्न झाली. नवीन गॅस टाकी खरेदी करण्यापासून ते गॅस टाकीचा शील उघडणे, रेगुलटर जोडणे, रेगुलटर बंद करणे, गॅस शेगडी हाताळणे, गॅस गळती टाळणे, गॅस गळती झाल्यास घेतली जाणारी खबरदारी आदी सर्व गोष्टीचे सादरीकरण व इतर गोष्टींचे मौलिक मार्गदर्शन श्री रावसाहेब ढाकणे यांनी केले.विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः गॅस हाताळण्याचा सराव या कार्यशाळेत केला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव काटे यांनी या कार्यशाळेचे प्रास्ताविक केले, श्री अर्जुन घुगे यांनी आभार मानले तर श्री कदम एन आर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी विद्यालयातील श्री दिलीप रनसिंग, प्रकाश दहिफळे, देवेंद्र बोडखे, मुकुंद आरे, सुबोध बरकले, किशोर गोर्डे, श्रीम विद्या भागवत,समद शेख,संजय मगर,काळे मामा, गुजर मामा आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.