जिजामाता पतसंस्थेच्या वतीने गुणवत्ताधारक विद्यार्थिनींचा सन्मान
शेवगाव (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च गुणवत्ता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, व मेहनतीचे जोरावर आपले भविष्य समृद्ध करावे असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथे गुणवंत विद्यार्थिनींच्या सन्मान कार्यक्रमावेळी सौ घुले बोलत होत्या.
दहिगावने येथील जिजामाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दहिगावने तालुका शेवगाव जिल्हा अहील्यानगर या संस्थेचे वतीने परिसरातील गुणवंत विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, स्मृती चिन्ह, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन नामदार राजश्रीताई घुले यांचे हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
यामध्ये गायत्री लोखंडे, प्रीती पवार, मयुरी खरात, सृष्टी कांबळे, गायत्री टाक, साक्षी चव्हाण या दहावी व बारावीच्या विद्यार्थिनींचा समावेश होता. कार्यक्रमासाठी सेवा संस्थेचे अध्यक्ष शब्बीर शेख, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुधे, रांजणीचे सरपंच काकासाहेब घुले, नवजीवन विद्यालयाचे प्राचार्य सुनील शिंदे, संस्थेचे चेअरमन कडूबाळ घुले, व्हॉईस चेअरमन बाळासाहेब वीर, ज्येष्ठ संचालिका मालती काकू जोशी, सुभाष पानसरे, पठाण मतीन, काळे राजाराम, राजधर इंदापुरे, पठाण हसीना व कर्मचारी वृंद उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक दिलीप जोशी यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संभाजी काळे यांनी केले तर कडूबाळ घुले यांनी आभार मानले.