४९ दिव्यांगांना तात्काळ लाभ प्रथमच मोफत हात, पाय, कॅलिपर्स
शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कृत्रिम अवयव प्रत्यारोपण मोफत शिबिरास शेवगाव तालुक्यातील दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात ८१ दिव्यांगांच्या तपासणी करण्यात आल्या त्यापैकी ४९ लाभार्थ्यांना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स यांचे मोजमाप करून तात्काळ मोफत वितरण करण्यात आले.
शिबिराचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना एका ठिकाणीच आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास टळला.या शिबिराचे आयोजन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, एलिम्को कानपूर आणि एस. आर. ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आयोजित झालेले दिव्यांगांसाठीचे पहिलेच व्यापक शिबिर होते.
शिबिराचे उद्घाटन शेवगाव तालुक्यातील तहसीलदार आकाश दहाडदे यांच्या हस्ते झाले.पंचायत समिती शेवगाव गटविकास अधिकारी सोनल शहा मॅडम तसेच शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना धोंडे, गौरी कट्टे नायबतहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर संपन्न झाले. सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष चांद शेख, सावली दिव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष गणेश महाजन, सावली दिव्यांग संघटनेचे सचिव नवनाथ औटी, प्रहार दिव्यांग संघटनेचे हरिभाऊ रकटे,गणेश हनवते, संजय नाचन, बाबासाहेब गडाख, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन तरवडे व त्यांचे सहकारी , प्रवीण कांबळे व त्यांचे सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते. शेवगाव तालुक्याचे तहसीलदार म्हणाले, दिव्यांगाना आजच शिबिरात मोजमाप घेऊन काही तासांत कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स यांचे वितरण करण्यात आले.त्याच बरोबर शेवगाव तहसील अंतर्गत दिव्यांगांच्या रेशनकार्ड बाबत व इतर अडचणी प्रधान्याने सोडवू शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी दर्शना धोंडे म्हणाल्या की दिव्यांगांच्या गरजा ओळखून तत्काळ सेवा देणे हेच आमचे उद्दिष्ट असून कृत्रिम अवयव बरोबरच शिबिरात आलेल्या दिव्यांग बांधवांची बी पी, शुगर, रक्त असी आरोग्य विषयक तपासणी करण्याचे तसेच दिव्यांग बांधवांची आरोग्य सेवा करण्याची आम्हांला संधी उपलब्ध झाली.पंचायत समिती शेवगाव गटविकास अधिकारी सोनल शहा मॅडम यांनी मनोगत व्यक्त करतांना ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी अश्या उपक्रमांची सातत्याने गरज आहे. त्याच बरोबर घरकुल योजनेत दिव्यांगांना प्राधान्य देऊन दिव्यांगांचा घरकुलाचा प्रश्न प्रधान्याने सोडवू.सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष चांद शेख मनोगत व्यक्त करतांना म्हणाले अधिकारी, पदाधिकारी, सेवा भावी संस्था तसेच संघटना, स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे दिव्यांग बांधवांना मोफत अवयव वितरण शिबीर शक्य झाले आहे त्याच बरोबर हालकीची व गरिबीची परिस्थिती असलेल्याने स्वखर्चाने कृत्रिम अवयव तयार करुन घेणे दिव्यांगांना शक्य नाही त्यामुळे झालेले शिबीर हे दिव्यांग बांधवासाठी वरदान ठरत आहे.शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी दोन्ही अधिकारी अत्यंत महत्वाचे आहेत.
शेवगाव तालुक्यातील दिव्यांगांना रेशनकार्ड तसेच अंत्योदय योजने प्रमाणे धान्याचा लाभ देणेबाबत कार्यवाही करावी.दिव्यांग बांधवावर व दिव्यांग संघटनेवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये. अशी मागणी तहसीलदार शेवगाव यांना तसेच दिव्यांग व्यक्तींना घरकुल मध्ये शासन निर्णयाप्रमाणे प्राधान्य देण्यात यावे अशी गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांच्याकडे मागणी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांनी केली आहे.
शिबिरात सहभागी झालेल्या अनेक लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, या शिबिरात आम्हांला सर्व काही एकाच दिवशी, एकाच ठिकाणी मिळाले. एलिम्को ही कानपूर संस्थेच्या तज्ञांनी प्रत्येक दिव्यांगाचे मोजमाप घेऊन त्यांच्या शरीरयष्टीस अनुरूप कृत्रिम अवयव बनवले आणि लगेचच त्यांचे प्रत्यक्ष प्रत्यारोपण केले. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी प्रत्यक्ष चालून पाहत समाधान व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश अडसूळ, दिनेश गरड, धोंडीबा नवघरे, अतुल धुमाळ, मुस्ताफ शेख, ज्ञानदेव शिरसाट, अतुल ससे, बाप्पू गायकवाड, गौरव खताळ, भारत बर्डे, स्नेहल निऱ्हाळी, सावलीचे चांद शेख व सर्व सावली संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रहारच्या राज्य महिला अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख आदींनी योगदान दिले. प्रास्ताविक आदिनाथ शिरसाठ सूत्रसंचालन आप्पासाहेब गायकवाड तर आभार प्रदर्शन नितेश मेघनार यांनी केले.