पारनेर ( प्रतिनिधी) राळेगणसिद्धी (ता. पारनेर ) येथील येथील रहिवासी व माजी सैनिक सर्जेराव भागचंद भालेकर (वय ८३) यांचे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांनी भारतीय सैन्य दलात १७ वर्षे देशसेवा बजावली. चीन, पाकिस्तान बरोबर युद्धात तीनवेळा ते सहभागी झाले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एस.टी.) चालक म्हणून २५ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी राळेगणसिद्धी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये आणि पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत संचालकपदाची जबाबदारी पार पाडली होती.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमवेत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी हौसाबाई भालेकर, मुले जि. प. प्राथ. शाळा हातगावचे प्राथमिक शिक्षक संजय, प्राथमिक शिक्षक किशोर, नवनाथ, एकनाथ, मुलगी संगीता इंगळे, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.