spot_img
spot_img
spot_img
spot_img

शहरात पावसात स्वच्छतेची दाणादाण उडाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहिले, नगरपरिषद आरोग्य विभाग कोमात

नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी अन् प्लास्टिकचा कचरा रोडवर येऊन रस्त्याला गटाराचे स्वरूप

शेवगाव (प्रतिनिधी) अनेक  दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेवगाव शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील सर्व रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहन चालकांना व पादचाऱ्यांना रस्त्यावरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. एसटी स्टँड चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खंडोबा नगर,वरुर चौफुली तसेच उपनगरामध्येआदी ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते

शेवगाव शहरामध्ये स्वच्छतेची दाणादाण उडाली असून, नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी अन् प्लास्टिकचा कचरा रोडवर येऊन रस्त्याला गटाराचे स्वरूप आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी अन् प्लास्टिकचा कचरा रोडवर येऊन रस्त्याला गटाराचे स्वरूप यादरम्यान, शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. शेवगाव शहरात दिवसेंदिवस समस्या वाढत असून पावसाळा सुरू होऊन तरीही नगरपालिका शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यास विसरल्याने शहरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे नाल्या, रोड व इतर सुविधांची दाणादाण उडाली आहे. नगरपालिका प्रशासनास नागरिकांचे काय संरक्षण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरामध्ये गुरुवार ७ ऑगस्ट रोजी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. नाल्या कचऱ्याने भरल्यामुळे त्यातील घाण व दुर्गंधीयुक्त पाणी व प्लास्टिकचा कचरा बाहेर आल्याने रोड दिसेनासा झाला होता. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन पादचाऱ्यांना पायी चालणे अवघड झाले होते. त्याचबरोबरच नाल्याचे घाण पाणी रोडवर आल्याने शहरात दुर्गंधी पसरली होत नगरपरिषद प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळते का असा प्रश्न शेवगावकरांना पडला आहे

Related Articles

Hoe een 5 euro deposit casino zonder cruks je speelplezier kan verhogen

In deze gids onderzoeken we hoe een 5 euro deposit casino zonder cruks je speelervaring in de online gokwereld kan verbeteren. We bespreken de...

Známky Nečestnosti Ako Sa Chrániť Roobet casino – Slovensko

Kasíno Coin.Games Poskytuje Živé Možnosti A Ponuky. Regulovaný Stránky Poskytnutie Spoľahlivý Odporúčanie Štandardy. Návštevníci Môžu Prístup Misie S Propagáciami. Záloha Terminus Ad Quem : Toto Cena Jeden...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!