spot_img
spot_img
spot_img
spot_img

जनविरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा या मागणीसाठी शेवगावमध्ये निदर्शना

शेवगाव ( प्रतिनिधी) इंडिया आघाडीतील घटक पक्षांसह जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती च्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते शेवगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी भाजप-महायुती सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर विधीमंडळात पारित केलेल्या जन सुरक्षा विधेयकाला विरोध करून हे विधेयक रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी आंदोलकांकडून सत्ताधाऱ्यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नक्षलवादाचा बीमोड करण्याच्या नावाखाली सरकार विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे सरकार च्या जनविरोधी धोरणाविरोधात आवाज उठवणारे यांचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा केला जात असून नक्षलवाद्यांच्या व दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी देशात व राज्यात अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत, त्यामुळे वेगळया कायद्याची गरज नाही. पण सरकार अंबानी, अदानी सारख्या भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांच्या विरोधात कोणीही आंदोलन करू नये, आवाज उठवू नये यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो. कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची, तीन ते सात वर्षे जेलमध्ये टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची व लाखो रुपये दंड करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. सुभाष लांडे यांनी केली

यावेळी डॉ. अमोल फडके म्हणाले की जनसुरक्षा विधेयक हे हुकूमशाही पद्धतीचे असून सरकारविरोधी आवाज दडपण्यासाठी किंवा विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भिती आहे. या विधेयकाला जन सुरक्षा विधेयकाचं नाव देऊन सरकारने सरकार सुरक्षा कायदा पारित केलेला आहे. तरी सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा, अशी मागणी यावेळी शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. अविनाश मगरे यांच्याकडून करण्यात आली.

यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲड सुभाष लांडे, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड अविनाश मगरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. अमोल फडके, समीर काझी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब डाके कम्युनिस्ट पक्षाचे कॉ संदीप इथापे, भगवानराव गायकवाड,कॉ बापूराव राशिनकर,बबनराव पवार, गोरक्षनाथ काकडे, विष्णू गोरे, संतोष लहासे, बब्रु वडघने, ॲड भागचंद उकिरडे ॲड गणेश ताठे, युवासेना प्रमुख अक्षय बोडखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कापरे, ॲड अतुल लबडे,उपाध्यक्ष निजाम  पटेल, विजय कराड, देविदास चव्हाण, शामराव ठोंबरे, गणेश क्षीरसागर, युवा सेना माजी शहरप्रमुख शितल पुरणाळे, महेश काटे, राजेंद्र गिरगे, रामेश्वर साळुंके, दशरथ धावणे, तुकाराम पांडुळे, ज्ञानेश्वर भराट, गोरक्ष भापकर, किसनराव डाके, कानिफ कर्डिले, बाजीराव अंगरक, मुकेश गिरम, आबासाहेब मोढे, सुरेश निकाळजे यांच्यासह जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती चे पदाधिकारी व इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर भ्याड खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा

आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर भ्याड खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा शेवगाव ( प्रतिनिधी)अहिल्यानगर आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर भ्याड खुनी...

शेवगावमध्ये ६ गणेश मंडळांसह डिजे चालकांवर गुन्हे दाखल

शेवगाव (प्रतिनिधी) गणेश विसर्जन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांकडून शहरातील सहा मंडळांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.ध्वनिमर्यादेची पातळी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!