आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर भ्याड खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा
शेवगाव ( प्रतिनिधी)अहिल्यानगर आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर भ्याड खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून कडक कारवाई करा शेवगाव तालुका आरपीआयच्या वतीने आज गुरुवारी शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले आहे
दिलेल्या निवेदन म्हटले आहे की नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर दिनांक 24/8/2025 रोजी रात्री अकरा वाजता त्यांचे गावी नान्नज तालुका जामखेड येथे काही सामज कंटकांनी त्यांचे कुटुंबावर खुनी हल्ला केलेला आहे सदर हल्ल्यांमध्ये त्यांचे कुटुंबातील महिला व पुरुष यांच्या वरती तलवारीने गंभीर स्वरूपात इजा करून त्यांना जखमी केले तरी सदरचे आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई होऊन सदर गुन्ह्यातील पाच ते सहा आरोपींना अटक झाली असून उर्वरित सर्व आरोपींना त्वरित अटक करून सदरचा खटला जलद गती न्यायालयात लावून चालवावा संबंधित आरोपींना त्वरित शिक्षा व्हावी आरोपीवर त्वरित कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन पोलीस निरीक्षण संतोष मुटकुळे साहेब यांना देण्यात आले या प्रसंगी प्रमुख तीन मागण्या आहेत 1)सर्व आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करणे,2)सुनील साळवे यांच्या कुटुंबास पोलीस संरक्षण देणे,3)सदर खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा.
याप्रसंगी उपस्थित सर्व आंबेडकरी समाज शेवगाव तालुका व शहर,सतीश मगर तालुका अध्यक्ष आरपीआय,कैलास तिजोरी नगरसेवक शेवगाव, राजेंद्र मगर तालुका सचिव आरपीआय,संजय लहासे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष,भगवान मिसाळ उपजिल्हाध्यक्ष भाजपअनुसूचित जाती,आप्पासाहेब मगर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार ,प्रदीप मोहिते युवक तालुका अध्यक्ष आरपीआय,अनिल राव इंगळे चेअरमन मार्केट कमिटी,कडू मगर तालुका उपाध्यक्ष आर पी आय,राकेश गरुड ग्रामपंचायत सदस्य वरुर,सुनीलआहुजा शहर सचिव आर पी आय,राजेंद्र घुटे शाखाध्यक्ष जोरापुर,अमोल आहेर उपसरपंच हिंगणगाव आरपीआय,गौरव मगर उपसरपंच येरंडगाव,सतीश बोरुडे,दीपक गायकवाड,राहुल पगारे,दीपक खरात,अरुण मगर,राजीव दुसंग,अशोक बनसोडे,प्रशांत मगर,विशाल इंगळे ,विजय गंगावणे,अमोल इंगळे, सुहास मगर,राहुल पवार,शिवा मगर,शेखर तिजोरे,किरण मगर,रामेश्वर तुजारे,या सह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.