spot_img
spot_img
spot_img
spot_img

पंचायत समिती सभापती पदासाठी ७ ऑक्टोंबर रोजी आरक्षण सोडत

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या ९ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, राज्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी (या सर्व प्रवर्गातील महिलांसह) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच निर्देशानुसार ही सोडत प्रक्रिया पार पडत आहे. नागरिकांनी या आरक्षण सोडत बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे.

अकोले पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी निश्चित करण्यात आले आहे. पंचायत समिती सभापती पदासाठी एकूण १३ पदे आरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १, अनुसूचित जाती (महिला)साठी १, अनुसूचित जमाती (महिला)साठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (महिला) २, सर्वसाधारणसाठी ३ आणि सर्वसाधारण (महिला)साठी ३ पदे आरक्षित आहेत.

Related Articles

हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही;

  प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना अहिल्यानगर (प्रतिनिधी ) हैदराबाद येथील *टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR)* यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून...

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २७ ते २९ ऑक्टोंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

  अहिल्यानगर ( प्रतिनिधी )भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व हलक्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!