spot_img
spot_img
spot_img
spot_img

शेवगाव तालुक्यातील चौघांना भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर

शेवगाव (प्रतिनिधी) डॉ मनी भाई देसाई मानव सेवा ट्रस्ट उरुळी कांचन व डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न डॉक्टर सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार 2025 जाहीर झाला असून आपल्या तालुक्यातील चौघांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जाहीर करण्यात आलेला आहे

डॉ मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट नीती आयोग संलग्नित आय एस ओ नामांकित संस्थेच्या वतीने डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र उरुळी कांचनच्या सहकार्याने हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक क्रांतिकारी सेवा व समर्पित भावनेने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक सामीलकी व सामाजिक बांधिलकीची जाण व भान ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना जोपासलेल्या सेवाभावी वृत्तीचा समाजसेवेचा व आदर्श रचनात्मक कार्याचा गौरव व्हावा म्हणून या सर्वांचा भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार 2025 डॉक्टर मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नीती आयोग संलग्नित दिल्ली , आय एस ओ नामांकित व डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे

या पुरस्काराचे सन्मानार्थी माजी सैनिक विनोद शेळके, माजी सैनिक अशोक भोसले, माजी सैनिक गणेश थोरात व बाळासाहेब फटांगरे आहेत या सर्वांना राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी हा पुरस्कार स्फूर्ती देईल या आशयाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा 31 ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणार आहे

या कार्यक्रमासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब लवांडे यांना निमंत्रित केले आहे या सर्व निवडीचे पत्र वाटपाच्या कार्यक्रमात खालील मान्यवर उपस्थित होते घनवट सर ,रावसाहेब लवांडे ,बाळासाहेब फटांगरे, विनोद शेळके, अशोक भोसले, गणेश थोरात, माऊली मुळे, दत्तात्रय फुंदे, अमोल देवडे, शिवाजी साबळे , अंबादास भागवत, अनिल शेळके माजी सैनिक शिवाजी बडे, माजी सैनिक चंद्रकांत घनवट, माजी सैनिक अनिल मस्के, माजी सैनिक सुरेश आव्हाड, बाळासाहेब क्षीरसागर ,सचिन शेळके , खेडकर ,नामदेव ढाकणे उपस्थित होते

Related Articles

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग करण्याच्या सूचना – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर ( प्रतिनिधी ) सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७...

एकनाथ माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुणे दिन साजरा

  शेवगाव (प्रतिनिधी)शेवगाव तालुक्यातील एरंडगाव  येथील एकनाथ माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दोन महत्त्वपूर्ण उपक्रम साजरे करण्यात आले: वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!