बोधेगाव जिल्हा परिषद गटातून फिरोजभाई पठाण उमेदवारी करणार.!
बोधेगाव ( प्रतिनिधी )शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा समजला जाणारा बोधेगाव जिल्हा परिषद गट यंदा सर्वसाधारण खुला प्रवर्गाचा झाल्याने या गटातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत आहेत. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण हे शरद पवार गटाकडून पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी करून पूर्ण ताकतीने बोधेगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवणार असल्याची माहिती फिरोजभाई पठाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. पुढे अधिक माहिती देताना श्री. पठाण म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून मी या परिसरातील सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रात कार्यरत असून शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने मी आवाज उठवला आहे. या भागातील सर्व समाज बांधवांचा मला पाठिंबा असून पक्षाच्या माध्यमातून बोधेगाव गटात माझा मजबूत आणि दांडगा जनसंपर्क आहे. बोधेगाव गट खुला प्रवर्गाचा झाल्याने अनेक इच्छुकांची चढाओढ या गटात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांच्या उमेदवारीमुळे बोधेगाव जिल्हा परिषद गटात नव्या राजकीय समीकरणांची निर्मिती होणार आहे
श्री. पठाण यांच्या उमेदवारीच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले असून या गटात रंगतदार लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. बहुतांशी या भागातील सर्व समाज बांधवांचा तसेच अनेक छोट्या-मोठ्या पक्षांचा फिरोजभाई पठाण यांना पाठिंबा असून तरुण वर्ग व विविध समाजघटकांमध्ये फिरोजभाई पठाण यांना मिळणारा पाठिंबा लक्षवेधी ठरत असून त्यांच्या उमेदवारीमुळे या गटातील निवडणुकीची लढत अधिक रोचक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




