शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या तीनने वाढली असून, प्रभाग संख्या १२ होणार आहे .२०१५ च्या पहिल्या निवडणुकीसाठी २१ प्रभाग व २१ नगरसेवकांची संख्या होती. यावर्षी एका प्रभागात दोन नगरसेवक याप्रमाणे १२ प्रभाग तयार करण्यात येणार आहे या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा ४ जुलै रोजी तयार करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने नगरपरिषदेत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शेवगाव नगरपरिषदेची स्थापना २०१४ साली झाली होती. दीड-दोन वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सन २०१५ प्रभागरचना करण्यात आली होती.
त्यावेळी एका प्रभागात एक नगरसेवक यापध्दतीने २१ प्रभाग निर्माण करण्यात येऊन नगरसेवक संख्या २१ ठेवण्यात आली होती व २०१६ ला शेवगाव नगरपरिषदेची पहिली निवडणूक झाली होती व निवडणूक आलेल्या नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडण्यात आला होता.
शेवगाव नगरपरिषदेसाठी च्या जनगणनेनुसार २०११ लोकसंख्या गृहीत धरली होती. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना चार वर्षे होऊनही झाली नाही. १४ वर्षांतील लोकसंख्या पाहता आता हा आकडा ५० हजार पेक्षा जास्त झाला आहे. शासनाने २०११ ची जनगणनेच्या आधारे लोकसंख्या धरली आहे.
शेवगाव नगरपरिषद हद्दीतील लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार आहे. यामध्ये कोणतेही वाढ न सुचवता तेवढीच प्रमाण मानण्यात आली आहे. एका प्रभागात दोनच सदस्य ठेवण्यात आले आहेत असा निकष लागू आहे. २०१६ ला २१ प्रभाग व एक नगरसेवक असे प्रमाण होते. आता एका प्रभागात दोन नगरसेवक प्रमाणे १२ प्रभाग व २४ नगरसेवक करण्यात आले आहे व जनतेतून नगराध्यक्ष पद निवडण्यात येणार असल्याने एक नगराध्यक्ष व २४ नगरसेवक असे एकूण २५ लोकप्रतिनिधी निवडण्यात येणार आहे.