spot_img
spot_img
spot_img
spot_img

शासन आदेशाप्रमाणे नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता करा वरील संपूर्ण शास्ती (व्याज) माफ करा : डॉ. अमोल फडके

शेवगाव  (प्रतिनिधी) शेवगाव नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये अनेक नागरिकांचा मालमत्ता कर थकलेला आहे, या मालमत्ता करावर नगर परिषदेचे दरमहा २ टक्के व्याज शास्ती लावलेले आहे. हि शास्ती किंवा व्याज लावल्याने अनेक मालमत्ता धारकांच्या थकबाकी मध्ये वाढ झालेली आहे. जेवढे थकबाकी असेल त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त शास्तीची रक्कम झालेली आहे त्यामुळे अनेकांना ही थकबाकी भरायची असून या जास्तीच्या रकमेमुळे अनेक मालमत्ताधारक थकबाकीचा क कर भरण्यास असमर्थ आहेत.त्या अनुषंगाने शासन निर्णयाप्रमाणे शास्ती माफ करण्यात यावी अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. अमोल फडके यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

राज्य सरकारने यासंदर्भामध्ये १५ एप्रिल २०२५ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगर परिषद मालमत्ता करा वरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्वरित या अभय योजनेची अंमलबजावणी होऊन नगरपरिषदेच्या हद्दीमधील थकीत मालमत्ता कारावरील शास्ती संपूर्ण माफ करण्यात यावी अशी मागणी अमोल फडके.  यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शेवगाव पाथर्डी विधानसभेचे अध्यक्ष बब्रु वडघणे, उपाध्यक्ष निजामभाई पटेल शहराध्यक्ष किशोर कापरे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष महेश काटे,राजेंद्र गिरगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

पंढरपूरच्या वारीत २८ लाखांच्या गर्दीचे उत्तम नियोजन

  सोलापूर  ( प्रतिनिधी) : पंढरपूरच्या यंदाच्या आषाढी वारीत उच्चांकी २८ लाख वारकरी आणि भाविकांची मांदियाळी जमली होती. परंतु एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण...

शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप

४९ दिव्यांगांना तात्काळ लाभ प्रथमच मोफत हात, पाय, कॅलिपर्स शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कृत्रिम अवयव प्रत्यारोपण मोफत शिबिरास...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!