शेवगाव (प्रतिनिधी )शेवगाव शहर व तालूक्यातील कृषी केंद्र चालकांकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची पिळवणूक दरवर्षी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते
जून महिन्यात मान्सूनला सुरवात होत असते. यंदा मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता शेतीची मशागत करून शेतकरी खते, बी, बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे या संधीचा गैर फायदा घेऊन खत, बियाणेचा काळाबाजार करणाच्या विक्रेत्यांवर कृषी अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी
अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भाऊ फुंदे यांनी केली आहे. कपाशीची नामांकित कपंनीच्या बियाणं मागणी प्रमाणे उपलब्ध होत नाहीत. दुकानदार जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून काळा बाजार करून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात तालुक्यातील शेतकऱ्यांना निर्धारित केलेल्या किंमतीत खते, बियाणे उपलब्ध झाली पाहिजेत. पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध ठिकाणी भरारी पथकाद्वारे काळा बाजार करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी केली आहे.