शेवगाव ( प्रतिनिधी) प्रवरा शैक्षणिक समुहाच्या शेवगाव इंग्लिश मीडीयम स्कूल व डॉ.बाळासाहेब विखे पाटील सी.बी.एस.ई.स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला. क्रिडा व योग शिक्षक विलास घोरतळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके, प्राणायाम व ध्यानधारणा केली.विद्यालयाचे शिक्षक लहाणु जवरे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू करण्यामागचा उद्देश तसेच आरोग्य दायी जीवनासाठी योगाचे महत्त्व विशद केले.संगीत विभागातर्फे जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून समुह गीते सादर करण्यात आली.
यावेळी प्राचार्या वर्षा दारकुंडे, उपप्राचार्य विजय चन्ने, उपप्राचार्य रमेश कवडे तसेच विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक विजय खंडीझोड यांनी केले