शेवगाव (प्रतिनिधी) :- कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या १०६ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने “आठवणीतले आबासाहेब” या पुस्तकाचे प्रकाशन व इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कोर्स’ व ‘पाककला शिक्षण उपक्रम’ चे उद्घाटन शनिवार दि.२८ जून २०२५ रोजी सकाळी ०८.३० वाजता आबासाहेब काकडे विद्यालय, नवीन इमारत, निर्मलनगर शेवगाव येथे होत असल्याची माहिती आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.डॉ. लक्ष्मण बिटाळ यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
पुढे बोलतांना डॉ.बिटाळ म्हणाले की, हा सुवर्णसोहळा विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे व मा.जि.प.सदस्य विक्रम तांबे यांच्या शुभहस्ते होत असून या कार्यक्रमासाठी चपराक प्रकाशन पुणेचे प्रकाशक घनश्याम पाटील हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. तर राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना समिती पुणेचे सदस्य तथा ‘आठवणीतील आबासाहेब’ चे संपादक श्री. संदीप वाकचौरे, यांसह आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड.डॉ.विद्याधर काकडे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ.हर्षदा काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. तरी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मोठ्यासंखेने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.डॉ. लक्ष्मण बिटाळ यांनी प्रतिनिधींशी बोलतांना केले आहे.
‘आठवणीतले आबासाहेब’ ही संदीप वाकचौरे यांची संपादीत साहित्यकृती असून कर्मयोगी अॅड. कॉ. जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या विषयींच्या मान्यवरांच्या आठवणी या लेखसंग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यात कॉ. मधुकर कात्रे, स्व. रावसाहेब लांडे, पुंडलिक गवंडी, स्व.डॉ.त्रिंबक पुरनाळे, लहू कानडे यासह एकून ६४ मान्यवरांच्या आबासाहेबांच्या विषयींच्या आठवणी यात शब्दबद्ध केलेल्या आहेत.