शेवगाव ( प्रतिनीधी ) सन २०२५ -२६ वर्षाकरिता रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या अध्यक्षपदी अंजूम फेब्रिकेशन उद्योग समुहाचे उद्योजक युसूफखान पठाण यांची तर सचिव पदी प्रा. विजयकुमार मुधोळकर यांची निवड झाली आहे.
शेवगाव रोटरीचे मावळते अध्यक्ष प्रा. काकासाहेब लांडे व सचिव वसिम शेख यांनी ही माहिती दिली. शेवगाव रोटरी क्लबचे संस्थापक डॉ. संजय लड्डा यांच्या पुढाकारातून रोटरीची स्थापना झाली असून यंदा रोटरी क्लबने १० व्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील काळात रोटरी क्लबने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. लवकरच पदग्रहण कार्यक्रमात नुतन पदाधिका-यांना पदाची सुत्रे दिली जाणार आहेत.
रोटरीचे ३११२ चे प्रांतपाल म्हणून सुधिर लातुरे तर सहप्रांतपाल म्हणून ईश्वर बोरा हे कामकाज करणार आहे. शेवगाव रोटरी क्लबच्या नविन संचालक मंडळात कोषाध्यक्ष म्हणून प्रा. गजानन लोंढे, डॉ. गणेश चेके, अॅड. अभिजित काकडे, मनेष बाहेती, डॉ. दिनेश राठी, डॉ. प्रतिक्षा बेडके, डॉ. मयूर लांडे, प्रा. काकासाहेब लांडे, डॉ. सुयोग बाहेती, प्रा. अण्णासाहेब दिघे, वसिम शेख, शब्बीरभाई शेख, डॉ. हरिचंद्र गवळी आदींचा समावेश आहे.
येत्या वर्षभरात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याबरोबरच गरजू लोकांना मदत, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, महिलांसाठी उपक्रम, आदर्श शिक्षक पुरस्कार, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला असल्याची माहिती नुतन अध्यक्ष उद्योजक युसूफखान पठाण व सचिव प्रा. विजयकुमार मुधोळकर यांनी दिली.