शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव तालुक्यातील मौजे आखेगाव येथील तळे ससाणे दलित वस्तीकडे जाणारा रस्ता दुरुस्त करून मिळावा या करिता शुक्रवार दि ४ रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वाखाली व शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पंचायत समिती येथे मौजे आखेगाव येथील तळे ससाणे दलित वस्ती येथील त्रस्त रहीवाशी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले
यावेळी सामाजिक युवा कार्यकर्ते सदाभाऊ खर्चन, रवींद्र निळ, राजू पठाण ,भागवत सर, शेख सलीम जिलाणी,अरूणभाऊ खर्च़न, रवींद्र ससाणे, अर्जून खर्चन , विनोद तांबे,राजूभाऊ खर्चन,राजू निकाळजे, तसेच महीला भगीणी शारदा खर्चन,शांता खर्चन,शन्नोबी पठाण, वैशाली ससाणे,शिला खर्चन, मनिषा तांबे व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच महीला भगीणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी महापुरुषांच्या जोरदार घोषणा देऊन, निष्क्रिय अधिकारी, ग्रामसेवक, यांच्या जाहीर निषेध करण्यात आला आपल्या कणखर भाषणात राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी निष्क्रिय शासनाचा खुपसून समाचार घेतला तसेच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या आंदोलनात महीला, शालेय विद्यार्थी विद्यार्थींनी , वयस्कर व्यक्तींचा मोठा सहभाग होता लेखी पत्र दिल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले