शेवगाव ( प्रतिनिधी) : शाळा म्हटलं की आपुलकीचं, जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं स्थान. इथल्या आठवणी नेहमीच ताज्या असतात, त्याच आठवणींमध्ये तब्बल २४ वर्षांनंतर नवीन भर पडली. निमित्त होते, बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील २०००/०१ च्या दहावी बॅचच्या स्नेह मिलन सोहळ्याचे. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनाथ शिंदे यांनी केले.
इतक्या वर्षांनंतर सर्व एकत्र आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना आपण काही तरी भेट द्यावी, या भावनेतून शाळेस ५५ इंच स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आली. तसेच, ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या शिक्षकांनी आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून योग्य मार्ग दाखवला त्या सर्व शिक्षकांचे या वेळी आभार मानण्यात आले.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, आपलं मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी अनेकांना गलबलून आलं, तर काही जणांना शब्दच फुटत नव्हते. या बॅचच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यानुसार शाळेचं व गावाचं नाव देशभरात पोहचवलं, त्या सर्वांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमीच असल्याचं या वेळी शाळेचे प्राचार्य तावरे सर व पर्यवेक्षक आंधळे सर यांनी बोलून दाखवलं.
या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी साईनाथ माळी, संजय चव्हाण, नंदकुमार वाघ, म्हसू लहाने, बिहारी तांबे, अमोल वैद्य, सुविधा बोथरा, कुणाल गोंधळी ,शेखनूर शेख,शिवाजी राजपुरे, विठ्ठल काकडे, राजकुमार अंतरकर, पांडुरंग राऊत, अशोक सगळे, सतीश लवंगे, अकिल शेख, रावसाहेब शिरसाठ, रवींद्र गरुड, बाबा शेख, उस्मान तांबोळी, जितेंद्र वीर, मल्हारी शिंदे, योगेश भोंगळे, हनीफ पठाण, शितल देशमुख, राहुल गरड यांच्यासह सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक राठोड, हुल्लावळे , निकाळजे , क्षिरसागर ,आदी आवर्जुन उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद देशमूख यांनी केले. तसेच, आभार प्रदर्शन हरिश्चंद्र फाटे यांनी मानले..