शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव तालुक्यातील वडूले खुर्द येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक २ मध्ये १०३ घरकुले मंजूर झाले असल्याची माहिती गावच्या लोकप्रिय,लोकनियुक्त सरपंच सौ. मीराबाई भाऊसाहेब आव्हाड यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडूले खुर्द गावाला पहिल्या टप्प्यात ६४ घरकुले मंजूर झाली असून त्यांचे काम प्रगतीपथावर आहे . तर दुसऱ्या टप्प्यात १०३ घरकुले मंजुर होऊन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला १५००० रुपये चा हप्ता जमा झाला असून लाभार्थ्यांनी तातडीने बांधकामास सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच उर्वरित हप्तेही काम पाहून दिले जातील असेही त्या म्हणाल्या. या योजनेतून प्रत्येक घरकुलास २,०८००० रुपये एवढा निधी मिळणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही अशा गरजू व्यक्तींनी ‘आवास प्लस’ या योजनेमध्ये स्वतः सर्वेक्षण करून आपले नाव नोंदण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सौ.आव्हाड पुढे बोलताना म्हणाल्या की, ग्रामपंचायत अधिकारी श्री पांडुरंग भगत साहेब, तसेच उपसरपंच सौ.रेणुका आव्हाड,ग्रामपंचायत सदस्य तात्याभाऊ तुतारे ,श्री रावसाहेब पाखरे, श्री रामदास पांढरे,सौ.अर्चना आव्हाड, सौ.त्रिवेणी आव्हाड,सौ.ललिता आव्हाड, सौ.रंजना रणमले,श्री.दादासाहेब गाडेकर व ग्रामपंचायत कर्मचारी श्री.बाप्पूसाहेब तुतारे,श्री.कानिफनाथ आव्हाड सर, श्री.मल्हारी आव्हाड सर, श्री.सचिन काळपुंड यांनी वेळोवेळी जनतेमध्ये जाऊन कागदपत्राची पूर्तता केल्यामुळेच आज एवढ्या मोठ्या संख्येने घरकुलाचा लाभ लाभार्थ्यांना देता आला. या कार्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले तसेच पुढेही असेच काम चालू ठेवण्याच्या सूचनाही दिल्या. लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.