शेवगाव (प्रतिनिधी) भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे
पूर्वीचे शेवगाव इंग्लिश स्कूल , व आताचे पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राचार्य शिवदास सरोदे आपल्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले संस्था व शाळेच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभ संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे , उपाध्यक्ष श्रीराम धूत,सचिव शामसुंदर भारदे , रागिनी भारदे,सहसचिव हरीश भारदे ,प्राचार्य संजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य सरोदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना प्राचार्य सरोदे म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सुरू झालेला माझा शैक्षणिक प्रवास संस्थेच्या विशेष सहकार्यामुळे प्राचार्य पदापर्यंत यशस्वीरित्यास पूर्ण झाला.आपल्या कार्यकाळात शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून नावलौकिक वाढवण्यासाठी सहकार्य केले. सर्वच क्षेत्रांमध्ये शिक्षकांना सोबत घेऊन संस्थेला अपेक्षित असे व शाळेच्या आत्तापर्यंतच्या उज्वल परंपरेला साजेसे कार्य मला करता आले.क्रीडाशिक्षक, पर्यवेक्षक, उपप्राचार्य, व प्राचार्य ही पदे भूषवताना मला संस्था व शाळेने केलेल्या विशेष सहकार्याबद्दल मी कायम ऋणी आहे. आपल्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने शाळेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या सर्व प्राचार्यांचे नाव व कार्यकाळाचा उल्लेख असलेला आकर्षक फलक त्यांनी शाळेला भेट दिला, तसेच आपल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाचे सचित्र वर्णन असलेल्या हस्तपुस्तिका वितरित करण्यात आल्या. आपल्या सेवापूर्तीप्रित्यर्थ कृतज्ञता म्हणून रोख रकमेचा धनादेश त्यांनी शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे यांचे कडे सुपूर्त केला.
यावेळी विविध सामाजिक संस्था, संघटना व शाळेच्या आजी-माजी पदाधिकारी मंडळींनी सरांचा सत्कार केला. उपस्थित शिक्षकांच्या वतीने प्रदीप बोरुडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी माजी प्राचार्य गोरक्ष बडे ,सुधीर आपटे, माजी क्रीडा शिक्षक एकनाथ शिरसाठ, छबुराव ठोकळ, रमेश पोरवाल, उपमुख्याध्यापक गोकुळ घनवट, पर्यवेक्षक उमेश घेवरीकर ,वैशाली जुन्नरकर, कार्यालयीन प्रमुख सदाशिव काटेकर उपस्थित होते.प्राचार्य संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक तर बाळासाहेब घावटे यांनी सूत्रसंचालन केले.
अजय सरोदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रमेश भारदे बोलताना म्हणाले, स्थापनेपासून आतापर्यंत शाळेच्या 75 वर्षात प्रगतीचा आलेख सतत उंचावण्यासाठी व्यवस्थापनाचे नेतृत्व महत्त्वाचे असते, सर्वांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून प्राचार्य शिवदास सरोदे यांनी प्राचार्य म्हणून पार पाडलेली जबाबदारी प्रशंसनीय आहे.