शेवगाव (प्रतिनिधी) गणेश विसर्जन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांकडून शहरातील सहा मंडळांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भारतीय न्याय संहितेचे विविध कलम, पर्यावरण संरक्षण कायदा आणि ध्वनिप्रदूषण विनियमन, नियंत्रणाच्या कलमांवन्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे दाखल झालेल्या मंडळाचे आदेशाचे नाव पुढील प्रमाणे आकाश बबन वखरे , संतोष शरद जाधव , ऋषिकेश शामराव वाघोले, गोविंद लक्ष्मण लांडे, कृष्णा दगडू धनवडे ,प्रविण अरुण भारस्कर सर्व राहणारे शेवगाव ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्यासह ६ डिजे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे
मिरवणुकीत लेसर लाईट पडली महागात; गणेश मंडळांवर गुन्हे दाखल
गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट वापरास जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले होते. या निर्बंधांचे उल्लंघन करून अनेक मंडळांनी लेसर दिव्यांचा झगमगाट केला. पण हा झगमगट आता गणेश मंडळांना चांगलाच महागात पडला आहे.
डीजेच्या आवाजाची किती पातळी असावी याचे निकष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेले आहेत. त्यानुसार यावर्षी गणेशोत्सवातील ध्वनिप्रदुषण रोखण्यासाठी शेवगाव पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरासह तालुक्यात डीजेच्या आवाजाची व ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी
मोजणी होणार आहे