spot_img
spot_img
spot_img
spot_img

22 वर्षानंतर एकत्र येत दिला जुन्या आठवणींना उजाळा, एकनाथ माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

शेवगाव ( प्रतिनिधी) शेवगाव तालुक्यातील समता जोगेश्वरी मंडळाच्या एकनाथ माध्यमिक विद्यालय एरंडगाव येथे सन 2002 – 2003 च्या इ.10 वी बॅचच्या माजी विद्यार्थी – शिक्षकांचा स्नेहमेळावा तब्बल 22 वर्षांनी अत्यंत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. बबनरावजी पवार होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी,” तुम्ही तुमच्या जीवनात जे काही काम करत आहात ते प्रामाणिकपणे करत रहा, एकमेकांशी प्रेमाने वागा, आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवा, तुमच्या पुढच्या पिढीला चांगले शिक्षण द्या आणि शाळेप्रती कायम चांगला स्नेहभाव ठेवा ” असे मौलिक उदगार काढले.यावेळी विचार मंचावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. वैशाली मोरे मॅडम,विद्यालयाचे मुख्याध्यापक  माधवराव काटे सर, खरडगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक  अरविंद देशमुख, सेवानिवृत्त शिक्षक साळवे सर, दहिफळे सर, नजन सर, काळे मामा, गुजर मामा आदी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनन, स्वागतगीत, राष्ट्रागीताने करण्यात आली. कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना अमोल धस यांनी मांडली,अनुमोदन योगेश चौधरी यांनी दिले.प्रास्ताविक बाळासाहेब गुजर यांनी केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा यथोचित सन्मान – सत्कार करण्यात आला. यावेळी कॉ. पी. बी. कडू पाटील, कॉ. एकनाथराव भागवत, कॉ. कृष्णनाथ ( अण्णा ) पवार यांच्या एकत्रित तैलचित्राचे अनावरन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बॅचकडून शाळेप्रती कृतज्ञता म्हणून शाळेला पाच शिलिंग फॅन सप्रेम भेट देण्यात आले. यावेळी सन २००२/२००३ या बॅचमध्ये प्रथम क्रमांक मनोहर भागवत यांनी मिळवला होता, त्याबद्दल त्यांचा सत्कार मलिकार्जुनेश्वर शेती सुविधा केंद्राचे संचालक श्री श्रीकृष्ण भागवत यांच्या वतीने शाल श्रीफळ आंब्याचे रोप देऊन करण्यात आला.श्रीकृष्णा भागवत, योगेश चौधरी, उमेश सुपेकर, संगिता भागवत, मनोहर भागवत,सचिन भागवत, देवीलाल परसैया, अविनाश खेडकर आदी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला व या विद्यालयाचे आमच्या जीवनात अणण्यसाधारण महत्व आहे हे अधोरेखित करून विद्यालयाप्रती मनात कायम स्नेहभाव असेल असे उदगार काढले.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीम मोरे मॅडम यांनी प्रत्येक माजी विद्यार्थी – विध्यार्थ्यांची मोठ्या स्नेहभावे विचारपूस करून समाधान व्यक्त केले.माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांचा शाळेप्रती असणारा स्नेहभाव पाहून श्री साळवे सरांनी आनंद व्यक्त केला. श्री देशमुख सर यांनी खास आपल्या विनोदी शैलीत माजी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व या बॅचचे विद्यार्थी विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत यावर समाधान व्यक्त केले.तर विद्यालयाचे मुख्याध्यापक  काटे सर यांनी समाज आणि शाळा यांचेतील स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी असे माजी विद्यार्थी मेळावे सतत आयोजित करावेत असे प्रतिपादन केले.
शाळेतर्फे प्रत्येक माजी विद्यार्थ्यांचा आंब्याचे रोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून ‘ झाडे लावा- झाडे जगवा ‘ हा मौलिक संदेश देण्यात आला.शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन माजी विद्यार्थ्यांच्या विविध मनोरंजनाच्या स्पर्धा, खेळ घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बाळासाहेब कुरुंद, ज्ञानेश्वर भागवत, देविदास भागवत, प्रकाश भागवत, गणेश सुपेकर, शरद भागवत, चंदूलाल गरोटे, सचिन राऊत, रोहिणी भागवत,वैशाली भागवत, संतोष कुरुंद अस्लम पठाण, सलीम शेख, ज्योती पोटे, आशा भवार, मनिषा आवारे, मंगल कुरुंद,अरुण बटूळे, अर्जुन गर्जे, संदिप ठोंबरे, सरस्वती कुरुंद, अशोक खाडे, पोपट वाघ आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अर्जुन घुगे सर यांनी केले तर आभार श्री कैलास नजन सर यांनी मानले.

Related Articles

Hoe Kans Ik De Voordeligste Online Casinos In Indiana De VS – NL Verzamel Bonus

Slotgard no deposit bonuscodes A reformista főnyeremény túlélés érdem válogatós figyelem , jellemző mindkettő hozzájárul potenciométer játékok és tökéletlen cica, amelyek keletkeznek minden körbefordulnak keresztben...

Comment Do Ane Register Atomic Number 85 7XM Casino · zone euro Réclamez Le Bonus

nobélium dépôt bancaire prime Tournaments et exceptional style ADHD colonnade zip au game card . comédien engagement poisson style même gouttes nasales Pêche et Glace...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!